| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

मुख्यपृष्ठ / पुढाकार

Review meeting at Bhandara


महिला व बालकांच्या विषयासंबंधी आज भंडारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. नियोजन भवनात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक लोहित मतानी, आयोगाच्या सदस्या आभा पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पवनीकर उपस्थित होते.

महिला व बाल विकास, कामगार, शिक्षण, परिवहन, आरोग्य, पोलिस अशा विविध यंत्रणांनी यावेळी आपली माहिती सादर केली.

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय करत असलेले प्रयत्न, पोलिस प्रशासनाकडून काउन्सिलिंग आणि पोलिस काका / पोलिस दिदी असे काही कौतुकास्पद उपक्रम भंडारा जिल्हा प्रशासन करत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्याची आकडेवारी असमाधानकारक आहे, याबाबत ८ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश कामगार विभागाला देण्यात आले आहेत. तसेच कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसांठी शासन राबवित असलेल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधितांनी ठोस काम करावे अशा सुचना यावेळी दिल्या.

u-1
u-1
u-1

u-1